अशी असेल समिती :
प्रत्येक माध्यमिक शाळा त्यांच्या स्तरावर मुख्याध्यापकासह कमाल सात सदस्यांची निकाल समिती गठीत करेल.
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सदर समितीचे अध्यक्ष राहतील.
विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा या सर्व विषयांच्या शिक्षकांचा सदस्य म्हणून समावेश असेल. सदस्यांपैकी उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक/सेवा जेष्ठ शिक्षक समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
असे असेल समितीचे निकाल नियोजन:
- संबंधित विषय शिक्षक आपल्या विषयाचा दिलेल्या कार्यपद्धतीनुसार निकाल तयार करतील व सदर निकाल वर्गशिक्षकाकडे सादर करतील.
- वर्गशिक्षक विषय शिक्षकांनी सादर केलेल्या विषय निहाय गुणांचे व श्रेणीचे संकलन करून आपल्या वर्गाचा निकाल मंडळाने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून, शाळेच्या या निकाल समितीकडे सादर करतील.
- निकाल समिती वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे परिक्षण व नियमन करून मंडळाने दिलेल्या सुचनांनुसार अचूक असल्याची खात्री करून स्वाक्षरीसह दोन प्रतीत प्रमाणित करतील.
- निकाल समितीने प्रमाणित केलेले गुण व श्रेणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली संगणक प्रणालीत नोंदवल्या जातील.
- निकाल समितीने अंतिम केलेल्या निकाल पत्रकाची एक मूळ प्रत समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने संबंधित शाळेत मुख्याध्यापकांच्या अभीरक्षेत ठेवण्यात येईल.
- निकाल समितीने अंतिम केलेल्या निकाल पत्रकाची दुसरी मूळ प्रत व इयत्ता नववीच्या विद्यार्थी निहाय अंतिम निकालाची समितीने साक्षांकित केलेली प्रत सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे सादर करण्यात येईल.
0 Comments