इयत्ता अकरावी सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
1. अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.
2. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
3. सदर प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील.
4. सदर परीक्षेचा पेपर 100 गुणांचा राहील.
5. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
6. परीक्षेमध्ये इंग्रजी, गणित ,विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा शनिवार दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
अकरावी सीईटी सात वेगवेगळ्या माध्यमांतून देतायेणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना संबंधित माध्यम निवडणे बंधनकारक असणार आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, उर्दू, कन्नड, सिंधी, अशा भाषांचे पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येतील. या भाषांची प्रश्नावली विद्यार्थ्यांना देण्यात येईल. जर विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजी माध्यम निवडले तर इंग्रजी, विज्ञान आणि गणिताचे प्रश्न इंग्रजीत असतील तर समाजशास्त्रांचे प्रश्न हे विद्यार्थ्यांने निवडलेल्या भाषेत विचारले जातील.
सदर परीक्षेसाठी खालील वेबसाईटवर जाऊन आपली परीक्षेसाठी ची नोंदणी नक्की करा.
सीईटी परीक्षेचा सराव करण्यासाठी तुमच्यासाठी ऑनलाईन असणाऱ्या दोन वेबसाईटच्या लिंक खाली देत आहोत भरपूर सराव करा.
11 CET ऑनलाइन टेस्ट वेबसाईट नंबर 1
11CET ऑनलाईन टेस्ट वेबसाईट नंबर 2
0 Comments