Career Counselling म्हणजे काय?
Career Counselling ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या योग्यता आणि व्यक्तीत्व यांचे वैज्ञानिकदृष्ट्या आकलन करून त्याच्या आकांक्षाना बळ दिले जाते, ध्येय ठरविण्यासाठी मदत केली जाते आणि योग्य मार्ग दाखविला जातो.
करिअर हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. करिअर निवडीवर आपले आर्थिक तसेच सामाजिक स्थान, समाधान आणि आनंद अवलंबून असते. आपल्याकडे करिअर ची निवड बहुतेक वेळा १०वी / १२ वी मध्ये मिळणाऱ्या गुणांवरून केली जाते. आई वडील, नातेवाईक किंवा मित्र मंडळाच्या सल्ल्याने ठरवले जाते की कोणती शाखा घ्यावी, कोणते ग्रॅड्युएशन करावे वगैरे हे सर्व पर्याय एखाद्याला उपयोगी पडतात आणि एखाद्याला उपयोगी पडत देखील नाहीत. प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्याहून वेगळा असतो, त्याच्या आवडी, क्षमता एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात आणि म्हणूनच एकच करिअर पर्याय सर्वांनाच पूरक असेल असे नसते. यासर्वामधून आपल्याला केवळ ठराविकच पर्यायाबद्दल माहिती मिळते. आज आपल्याकडे हजारो करिअर पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांची माहिती आपल्याला नसते. अशा वेळी करिअर मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरते. करिअर तज्ञ (Expert) आपल्याला योग्य करिअर ची निवड करण्यास कोणकोणते पर्याय उपलब्ध आहे ? आणि तिथे कसे पोहचायचे याबद्दल ची माहिती देतात. आणि म्हणूनच Career Counselling योग्य वेळी करणे महत्वाचे ठरते. जर तुम्ही तुमच्यासाठी योग्य करिअर ची निवड करू शकत नसताल तर वेळ न दवडता योग्य करिअर Counsellor मार्फत तुमच्यासाठी योग्य करिअर ची निवड करू शकता.
Career Counsellor करिअर निवडण्यासाठी कशी मदत करतात ?
करिअर Counsellor, तुम्हाला अशा करिअर ची निवड वैज्ञानिक पद्धतीने करण्यास मदत करतात. म्हणजेच काय तर व्यक्तीमत्व प्राधान्य (Personality Preferences), व्यक्तीची एखाद्या क्षेत्रातील रुची (Interests), त्याच्या क्षमता (Skills and Abilitites) यांचा अभ्यास केला जातो आणि त्यांच्यासाठी योग्य करिअर पर्यायांची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाते, जेणेकरून तुम्ही योग्य तो पर्याय निवडू शकता.
केव्हा आणि कोणी करावे Career Counselling?
वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिकांच्या मते, किमान १४ १५ वय वर्ष किंवा इयत्ता ९ वी / १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर Counselling करण्यास अत्यंत योग्य वेळ आहे. या वयातील मुलांचा बौद्धिक विकास झालेला असतो, मुलांना स्वतःचे मत असते आणि ते व्यक्त करता येऊ शकते आणि त्याचबरोबर शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा असतो. या व्यतिरिक्त इयत्ता ११वी / १२वी, ग्रॅड्युएशन झालेले किंवा करत असलेले, एखादी नोकरी / व्यवसायात असणारे देखील अधिक पर्याय निवडीसाठी करिअर Counselling करू शकतात.
करिअर Counselling योग्य वेळी नाही केले गेले तर होणारे परिणाम ?
काही विद्यार्थाना आपल्याला नेमकं कोणते करिअर करायचे आहे, आपल्या क्षमता यांची माहिती असते तर काही जण त्याबद्दल साशंक असतात. एखादे करिअर आपल्याला अनुरूप आहे का ? आपल्या क्षमता ? याबददल शंका असते. योग्य करिअर मार्गदर्शन नाही मिळाले तर विद्यार्थी कदाचित चुकीचा पर्याय निवडू शकतात. अशा वेळी खालील काही परिणाम पाहायला मिळतात
1.शिकण्यामध्ये स्वारस्य राहत नाही.
2.शाळा / कॉलेजेस मध्ये अनुपस्थिती. परीक्षेमध्ये गुण कमी मिळणे.
3.अभ्यासातही अती परिश्रम घ्यावे लागणे. वेळ आणि पैशाचा अपव्यय.
4.विचारांचा गोंधळ परिणामी लक्ष्याचा अभाव.
5.औदासिन्य
करिअर Counselling केल्याने होणारे फायदे कोणते ?
करिअरचा पर्याय जेव्हा विचारपूर्वक, तर्कसंगत पद्धतीने निवडला जातो तेव्हा विद्यार्थी पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो आणि कोणतीही साशंकता त्याच्या मनामध्ये नसते.
असे काही फायदे खाली दिले आहेत -
1.मुलांच्या मनामध्ये साशंकता नसणे.
2.मुलांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, आवडीची आणि क्षमतांची माहिती होते आणि भविष्यामध्येदेखील काही निर्णय घ्यावयाचे झाल्यास याचा त्यांना फायदा होतो.
3.मुलांचा √ योग्य दिशेने प्रयत्न सुरु केल्यामुळे, अनावश्यक वेळ आणि खर्च टाळता येतो.
4.विषय किंवा क्षेत्र आवडीचे असल्याने अभ्यासाची आवड निर्माण होते. कमी वेळातदेखील परिणामकारक अभ्यास करू शकतात. परिणामी मिळणाऱ्या गुणांमध्ये वाढ होताना दिसते.
5.मुलं जिद्दीने अभ्यास करू लागतात, आशावादी राहतात, समाधानी आणि आनंदी असतात.
करिअर Counselling ने तुम्हाला योग्य करिअर पर्याय तर मिळतोच परंतु त्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांची देखील माहिती करून त्यावर कशी मात करता येईल हे देखील सांगितले जाते.
अशा प्रकारे केलेल्या Career Counselling मधून योग्य करिअर निवडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन, ते साध्य करण्याचा आत्मविश्वास आणि विचारांची स्पष्टता मिळण्यास मदत होते.अशी मदत हवी असल्यास तुम्ही मला निसंकोच फोन करू शकता.
धन्यवाद!
सौ. नेहा पाटील नलावडे (M.S),
Career Guidance and Counselling Expert.
मो. 9699445258
2 Comments
Career संदर्भात असनारी संदिग्धता दूर करनारे व्यापक आणि मुद्देसुद मार्गदर्शन
ReplyDeleteNice Information Madam.
ReplyDeleteIam also Career Counsellor.Can I Share this information to students?