२. संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर |
गळां बांधोनियां दोर ||१||
हृदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडिला ||२||
शब्दें केली जवाजुडी ।
विठ्ठल पायीं घातली बेडी ||३||
सोहं शब्दाचा मारा केला ।
विठ्ठल काकुलती आला ||४||
जनी म्हणे बा विठ्ठला ।
जीवें न सोडीं मी तुला ||५||
[सकलसंतगाथा खंड पहिला : संत जनाबाईंचे अभंग अभंग क्र. १८०]
संपादक- प्रा. डॉ. र. रा. गोसावी.
0 Comments