२. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
प्रस्तुत धडा प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेला आहे. आपण शाळेत रोज प्रतिज्ञा म्हणतो या प्रतिज्ञेतील तिसरे वाक्य माझ्या देशावर माझे प्रेम आहे या वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न या धड्यात केला गेला आहे. प्रतिज्ञा मध्ये आपण जे काय म्हणतो त्या प्रत्येक शब्दामागे एक विशिष्ट संकल्पाचे बळ आहे आपण जे म्हणतो तेच आपल्याला करायचे आहे असा विश्वास आपल्याला प्रतिज्ञेमधून मिळतो. या धड्याचे लेखक यदुनाथ थत्ते एक दिवशी एका शाळेत गेले होते योगायोगानं ती शाळेच्या प्रार्थनेची वेळ होती प्रतिज्ञा संपल्यानंतर लेखकांनी त्या मुलांबरोबर मारलेल्या गप्पा या धड्यात दिलेल्या आहेत.
0 Comments