कबड्डी हा खेळ भारतातील प्राचीन खेळापैकी एक आहे. सुरुवातीला या खेळाचे कोणत्याही पद्धतीचे पक्के रीतिरिवाज नव्हते वेळेनुसार नियम बनवले गेले आणि त्यामध्ये बदल केला गेला. हळूहळू कबड्डी हा खेळ खूप लोकप्रिय होत गेला व गावपातळी पासून सुरू झालेला हा खेळ जगभरातील मोठ्या शहरांमध्ये प्रसिद्ध झाला.
कबड्डी खेळण्याकरिता एक समपातळीतील आणि नरम मैदान तयार केल्या जाते.मैदान तयार करण्यासाठी पोयटा माती, लाल माती इ. चा वापर केल्या जातो पुरुष- महिला आणि ज्युनियर वर्गाकरिता मैदान वेगवेगळ्या आकाराचे असते.
प्रत्येक खेळाडूने बनियन व हाफ पॅन्ट खेळण्यासाठी घालणे आवश्यक असते. पायात सॉक्स आणि कापडी बूट घालावा. प्रत्येक खेळाडूच्या बनियनवर नंबर लिहिलेला असतो.बनियनच्या छातीवर नंबर ४ इंच लांब आणि पाठीमागे ६ इंच लांब नंबर लिहिलेला असतो.याशिवाय कुठलीही अन्य वस्तू घालू नये असे खेळाडूंना बंधन असते.
0 Comments