Ad Code

नवरात्र उत्सव प्रश्नमंजुषा navratra utsav

 


           नवरात्र उत्सव

हिंदू धर्म म्हटला की सण-उत्सवाला उधाण येत .नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर, आपल्या लक्षात येईल की हिंदू धर्मामध्ये सर्वच उत्सव हे विविध प्रकारे साजरे केले जातात; पण, नवरात्र हा उत्सव आपल्या समाजात इतक्या विविधरंगी प्रकारे साजरा केला जातो, की ते पाहून सगळ्यांना अगदी थक्क व्हायला होते. मुलांनो,  श्रावण महिना सुरू झाला की सुरू होतात ते आपल्या सर्वांचे विविध सण आणि उत्सव! खरंतर, यात विशेष करून गणपती उत्सव संपला की आपणा सर्वांना वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे.नवरात्र उत्सवाचा आनंदच वेगळा.

                          घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत ही निराळी असते. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. आपल्या सगळ्यांचे  नऊ दिवस अगदी धावपळीचेच असतात. 

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे देवीचे  नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. 

या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नमः' 

असेच म्हटले जाते.

Post a Comment

0 Comments

Ad Code