Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

परीक्षा ताण दृष्टिकोन exam tension Positive thinking part 3

 परीक्षा .. ताण .. आणि दृष्टिकोन ! 

  


पालक आणि शिक्षक विदयार्थ्यांना कशा प्रकारे मदत करू शकतात ? 


परीक्षेचा काळ निश्चितच महत्वाचा काळ असतो आणि  पालक त्याबद्दल नक्कीच जागरूक ही असतात. 

पालकांनी परीक्षेसोबत येणारी आपली  काळजी, चिंता, ताण विद्यार्थ्यांसमोर शक्यतो व्यक्त करणे टाळावे. 

आपल्या मुलाला किंवा मुलीला आत्ता आपल्या सहवासाची, पाठींब्याची, प्रेरणेची जास्त गरज असते. 

ती वेळोवेळी आपल्या बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त करू शकता. 


या सर्व गोष्टी मुलांचा नक्कीच आत्मविश्वास वाढवतील.

आपणच आपल्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला सर्वात चांगले ओळखता, त्यांच्यातील कमी अधिक गुणांचा स्वीकार करा, केवळ तुमच्या हट्टासाठी मुलांवर अवाजवी अपेक्षा लादणे योग्य नाही. 

तुमच्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि मुलांच्या क्षमता यावर मुलांशी शांतपणे चर्चा करू शकता. 


वरील संवाद मुलांसाठी आणि पालकांसाठीही अनावश्यक ताण दूर ठेवण्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो का ?नाही ना मग असा संवाद टाळा व त्याला येणाऱ्या अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न करा, शक्य असल्यास योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून द्या.

आपला मुलगा/मुलगी पुरेशी झोप, जेवण -पाणी घेतोय ना यावर लक्ष ठेवा. त्यांची दिनचर्या बनवण्यास आणि ती पाळण्यासाठी त्यांना मदत करा.

निवांत क्षणी त्यांच्याशी मन मोकळे पणे संवाद साधा, त्यांचे विचार, अडचणी शांत पणे ऐकण्याचा प्रयत्न करा. 

भविष्यासाठी, करिअर साठी, त्यांना निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर सर्व बाजूंनी त्यावर चर्चा करा.

तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकता. मुलांना निर्णय घेण्यासाठी मदत करा, पण तुमचा निर्णय त्यांच्यावर लादण्याचे टाळा. 

आपला मुलगा तणावात आहे असे वाटले आणि परिस्थिती बिघडत आहे वाटल्यास वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या. 


लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना परीक्षेच्या काळात तुमच्या विश्वासाची, प्रेमाची,सोबतीची जास्त गरज असते. 

परीक्षेचा परिणाम काहीही राहिला तरी तुम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे असणार आहे असा विश्वास तुम्ही त्यांना देऊ शकता. 

मुले घेत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवा. 

परीक्षेत मिळणाऱ्या गुण, यश-अपयशापेक्षा त्यांनी घेतलेल्या कष्टांचे कौतुक करा. 



तुमचा विश्वास आणि पाठिंबा मुलांसाठी कोणत्याही अवघड परीक्षेत त्यांना खूप बळ देतो. 

यशाचं कौतुक होतेच , परंतु अपयशही सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मुलांना केवळ तुम्हीच मदत करू शकता. 

अपयश म्हणजे सगळं संपले असे नाही, अपयशाकडे नवीन संधीच्या दुष्टीकोनातून पाहायला शिका, नव्याने सुरवात करण्यासाठी मुलांना बळ देऊ शकता.

यशाच्या अनेक संधी त्यांची वाट पाहताहेत आणि या प्रवासात तुमचा सहवास आणि प्रेम कधीच कमी पडणार नाही याची जाणीव मुलांना करून द्या. 

लक्षात ठेवा, आयुष्यात अनेक परीक्षा येतील आणि जातील. ताण, भीती,काळजी याहीपेक्षा महत्वाची गोष्ट असते तुम्हाला मिळणारे ज्ञान, विविध कौशल्य विकसित करण्याची संधी ! यश आणि अपयश हा परीक्षांचा एक भाग असणार आहे.परंतु तुमचा आत्मविश्वास, ध्येयाप्रतीची निष्ठा जास्त मोठी असते आणि म्हणूनच परीक्षांकडे  पाहण्याचा आपला दृष्टिकोन प्रत्येकाला ठरवावा लागेल.


तुम्हा सर्वाना परीक्षेसाठी खूप- खूप शुभेच्छा! 

धन्यवाद !

(आपणास आपल्या पाल्याबद्दल  काहीही मदत हवी असल्यास आपण मला संपर्क करू शकता.)

सौ. नेहा पाटील - नलावडे 

Career Counsellor & Parenting Expert

Conatct : 9699445258

Post a Comment

0 Comments

Ad Code