विदयार्थ्यांचे नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव दुरुस्ती करावयाची असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक असतात...
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर)
(२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस
(३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
(४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र
(५) जे नाव दुरुस्त करुन पाहिजेत त्या नावाचे विदयार्थ्यांचा आधारकार्ड, आईचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, विदयार्थ्यांचा जन्मदाखला अथवा महाराष्ट्र शासन राजपत्र
विदयार्थ्यांचा जातीत दुरुस्ती करावयाची असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक असतात.....
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर )
(२) नमुना क्र. ०३ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस
(३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
(४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र
(५) उपविभागिय अधिकारी यांचेकडील विदयार्थ्यांचा जातीचा दाखला
(६) उपविभागिय अधिकारी यांचेकडील पालकांचा जातीचा दाखला
विदयार्थ्यांची जन्मतारिख / जन्मठिकाण दुरुस्ती करावयाचे असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक असतात....
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर)
(२) नमुना क्र.०१ व त्यावरील मुख्याध्यापकांची शिफारस
(३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
(४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र
(५) विदयार्थ्यांचा नावासहीत जन्मदाखला
(६) विदयार्थ्यांचा इ.१ ली, ४ थी व ७ वी चे निर्गम उतारा
विदयार्थ्याच्या पालकांचे नाव व आडनाव बदल करावयाचा असल्यास (दत्तक विधानानुसार अथवा आईचे पुर्नविवाह नुसार) खालील कागदपत्रे आवश्यक असतात....
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर)
(२) नमुना क्र.०२ व त्यावरील मुख्याध्यापकांची शिफारस
(३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
(४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र
(५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र
(६) दुय्यम निबंधक कार्यालयाकडील दत्तकविधानपत्र
(७) आईचे मा.न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल
(८) आईचे पुर्नविवाह नोंदणी प्रमाणपत्र
(९) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड
विदयार्थ्यांच्या पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव लावायचे असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक असतात....
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर )
(२) नमुना क्र.०२ व त्यावरील मुख्याध्यापकांची शिफारस
(३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
(४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र
(५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र
(६) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल व निकालामध्ये सदर विदयार्थ्यांची कस्टडीयन आईकडे असणे आवश्यक आहे
(७) विदयार्थ्याच्या नावासहीत रेशनकार्ड
उपरोक्त प्रस्तावामधील सर्व कागदपत्रे शाळेचे मुख्याध्यापक यांनी पडताळणी करुन साक्षांकीत करुन जोडणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तावाची एक प्रत शाळेच्या दप्तरी कायम ठेवण्यात यावी.
जर विदयार्थी शाळेमध्ये शिकत नसेल त्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारीख /जात दुरुस्ती करता येत नाही याची नोंद घ्यावी.
तसेच इ. ११ वी १२ च्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख /जात दुरुस्ती बाबतचा प्रस्ताव मा. शिक्षण उपसंचालक पुणे यांचेकडे सादर करावे लागतात .
0 Comments